महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचे बीगूल वाजले

प्रतीनीधीनी नरेश /समाधान खरात
महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आहे.सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात होता.
दरम्यान, (दि. 15 रोजी ) केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दुपारी 3.30 वाजता दिल्लीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी निवडणूक आयोगाकडून झारखंड आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
यंदा महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून, 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे.
   महाराष्ट्रात एकूण 1 लाख 186 मतदान केंद्र आहेत. ग्रामीण भागात 57 हजार 601 आणि शहरी भागात 42 हजार 582 केंद्र आहेत. महाराष्ट्रात 9 कोटी 63 लाख मतदार हक्क बजावणार आहेत. तसेच वरिष्ठ नागरिक आपल्या घरून देखील मतदानाचा हक्क बजावू शकतील. असं देखील यावेळी सांगण्यात आलं आहे.


महाराष्ट्रात एकूण मतदान केंद्र – 1 लाख 186

ग्रामीण मतदान केंद्र – 57 हजार 601

शहरी मतदार केंद्र – 42 हजार 582

महाराष्ट्रात मतदारांची संख्या 

दिव्यांग – 6 लाख 2 हजार

नवमतदार – 1. 85 कोटी

पुरुष मतदार – 4.97 कोटी

महिला मतदार – 4.66 कोटी

एकूण मतदार – 9 कोटी 63 लाख

महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे लढले होते. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचीही युती होती. या निवडणुकीत भाजप 105 जागा जिंकून राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील एकसंध शिवसेनेने 56 जागांवर विजय मिळवला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आणि 44 विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे आमदार निवडून आले होते.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....