आमदार बबनराव लोणीकर यांना कॅबिनेट मंत्रीपदासह जालना जिल्ह्याचे पालकत्व द्या -संजय भालेराव
जालना प्रतिनिधी समाधान खरात
परतूर मंठा विधानसभा मतदारसंघात भाजपाचे मा मंत्री आ बबनरावजी लोणीकर भरघोस मतांनी पुन्हा पाचव्यांदा निवडून आलेले आहेत, मराठवाड्यात भाजपाचे ज्येष्ठ नेते म्हणून मा लोणीकर यांच्याकडे पाहिले जाते लोणीकर यांनी त्यांच्या मंत्रीपदाच्या कार्य काळामध्ये वॉटर ग्रेड योजना अत्यंत अभ्यास व कर्तृत्वपणाने राबवलेली असून, याचा मोठ्या प्रमाणात मराठवाड्यात सह परतुर मंठा विधानसभा मतदार संघातील जनतेला अनेक वस्त्यांमध्ये 200 गावाला आज शुद्ध पिण्याचे पाणी मिळत आहे, मतदारसंघातील मागासवर्गीयांच्या अनेक वस्त्यांमध्ये पिण्याचे पाणी ची सोय, सभामंडप,रस्ता नाली, स्मशानभूमी, यासह मागासवर्गीयांसाठी रमाई योजना अंतर्गत हजारो घरे उपलब्ध करून मा लोणीकर साहेबांनी दिलेले आहेत, आंबा ताप परतुर येथे मागासवर्गीय मुलींच्या 100 क्षमता असलेल्या 15 कोटी रुपयांच्या वस्तीग्रहाचे अद्यावत बांधकाम करण्यात आलेले आहे, तसेच मंठा जि जालना येथे सुद्धा 100 क्षमता असलेल्या मागासवर्गीयांच्या मुलींच्या वस्तीगृहाचे काम सुद्धा मा लोणीकर यांच्या कार्यकाळात झालेले आहे, मतदारसंघातील अनेक वस्ती वाड्या छोट्या छोट्या गावांमध्ये अंतर्गत रस्ते मुख्य रस्त्याला डांबरी करण्याने जोडलेले आहेत, परतूर मंठा विधानसभा मतदारसंघात यांच्या मागील दहा वर्षाच्या कार्य काळा मध्ये प्रचंड विकासाची कामे करण्यात आलेली आहे, मागासवर्ग समाजाच्या युवकांना रोजगाराच्या उंबरठ्यावर उभा करण्यात आलेले आहे, मतदार संघातील 18 पगड सर्व जाती धर्माला सोबत घेऊन विकासाची कामे करणारा सर्वसामान्य कार्यकर्ता बबनरावजी लोणीकर आहेत, परतूर मंठा विधानसभा मतदारसंघातील तमाम आंबेडकरी व भीमसैनिकांची लोणीकरांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान देऊन जालना जिल्ह्याचे पालकत्व देण्याची आग्रही मागणी करीत आहोत असे प्रतिपादन भीम उद्योग अभियानचे संस्थापक अध्यक्ष मा संजय भालेराव यांनी केले आहे