'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' स्पर्धेत शांतिनिकेतनचे यश
जालना प्रतीनीध नरेश अन्ना जालना शहरातील संभाजीनगर भागातील शांतिनिकेतन विद्यामंदिर या शाळेने मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन मध्ये तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक मिळविला शासनाच्या वतीने सन 2024-25 मध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना अंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा हे अभियान सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांकरिता राबविण्यात आले. या अभियानात शहरातील संभाजीनगर येथील शांतीनिकेतन विद्यामंदिर शाळेने भास्करराव अंबेकर यांच्या मार्गदर्शनात खाजगी व्यवस्थापन प्रकारात जालना तालुक्यातून द्वीत्तीय क्रमांक पटकावला. शाळेच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष भास्करराव अंबेकर यांनी शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी महिंद्र देशपांडे, माजी सभापती देवनाथ जाधव, हरिहर शिंदे, डॉ.माधव अंबेकर, बाला परदेशी, दीपक रणवरे, नर्सिंगच्या प्राचार्य लियांता निर्मल आदींची यावेळी उपस्थिती होती. या अभियानात पायाभूत सुविधा, शासन ध्येय धोरण यांची अंमलबजावणी व शैक्षणिक संपादमुख या तीन प्रमुख निकषावर आधारित मूल्यमापन करण्यात आ...