भिम उद्योग अभियानच्या जिल्हा महिला समन्वयक पदी सौ शारदा ताई गवई यांची निवड
जालना प्रतिनिधी समाधान खरात
भिम उद्योग अभियान जालना जिल्हा समन्वयकाची बैठक संस्थापक अध्यक्ष संजय भालेराव यांच्या अध्यक्षते खाली नागसेन ग्रंथालय अंबड रोड जालना येथे संपन्न झाली, राजेश ओ राऊत,{ राज्य महासचिव }डॉ सुरेंद्र खाडे{ राज्य उपाध्यक्ष} मा महेंद्र रत्नपारखे {मराठवाडा विभागीय अध्यक्ष} आदींनी उद्योग व्यवसाय संदर्भात आपले सखोल मनोगत व्यक्त केले सदर बैठकीमध्ये औद्योगिक विकास महामंडळ यांनी भिम उद्योग अभियान च्या( अनुसूचित जाती जमातीच्या ) उत्पादन उद्योगासाठी जालना शहराच्या PIII मध्ये प्लॉट वाटप करण्याची मागणी करण्यात येऊन,अनुसूचित जाती जमातीच्या नवउद्योजकांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर इन्व्हेस्टमेंट फंड योजनेचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचे आवाहन भालेराव यांनी केले
या बैठकीमध्ये भिम उद्योग अभियानच्या जिल्हा महिला समन्वयक पदी सौ शारदा ताई गवई यांची निवड करण्यात आली नवीन वर्षात 1 जानेवारी 2025 रोजी भिम उद्योग अभियान वतीने नागसेन ग्रंथालय अंबड रोड जालना येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे येणाऱ्या आगामी काळात केंद्र व राज्य शासनाच्या योजना अनुसूचित जाती जमातीच्या व्यावसायिक तरुण व नव उद्योजकांपर्यंत पोहोचण्यासाठी SC/ST हब ची कार्यशाळा घेण्याचे ठरले
या बैठकीत मनोज वाकळे {जिल्हासमन्वयक } सौ शारदाताई गवई {जिल्हा महिला समन्वयक} मा डी वाय मोकळे {इंजिनियर } मा विनोद रत्नपारखे {इंजिनियर} श्रावण गायकवाड, किरण रणशूर, दीपक रायकर,श्याम शिरसाट, विजय पैठणे,सौ विशाखा शिरसाट, यासह अनेक नवउद्योजकांची उपस्थिती होती
सदर बैठकीत भिम उद्योग अभियानाच्या वतीने मराठवाड्यातील आंबेडकरी चळवळीचे नेते, ढाण्या वाघ, पॅंथर, मा विजय दादा वाकोडे व संविधान प्रेमी भीमसैनिक,मा सोमनाथ सूर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली