न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चा संघ विभागीय आट्या पाट्या स्पर्धेसाठी रवाना.

परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग , क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद जालना यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित जिल्हास्तरीय आट्या पाट्या स्पर्धेत न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज  या विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकविला त्यांना या  स्पर्धेचे कोच म्हणून  विनायक बोरकर यांनी मार्गदर्शन केले तर  कॅप्टन रविन्द्र खरात, रवीराज गोलांडे, हनुमान सोळंके, विश्वजीत बेरगूडे यांच्या सह  विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकवून  शाळेचे नावलौकिक केले  या नंतर शाळेतील विध्याार्थी विभागीय स्पर्धेत उत्तम कामगिरी करतील असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष  गणेश सोळंके , मुख्याध्यापक  शाम सर क्रिडा शिक्षक  विजय सर यांनी  व्यक्त केला  या सह  शिक्षक वृंदानी पुढील स्पर्धेसाठी विध्यार्थ्याना  शुभेच्छा दिल्या.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....