'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' स्पर्धेत शांतिनिकेतनचे यश

जालना प्रतीनीध नरेश अन्ना 
जालना शहरातील संभाजीनगर भागातील शांतिनिकेतन विद्यामंदिर  या शाळेने मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन मध्ये तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक मिळविला शासनाच्या वतीने सन 2024-25 मध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना अंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा हे अभियान सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांकरिता राबविण्यात आले. या अभियानात शहरातील संभाजीनगर येथील शांतीनिकेतन विद्यामंदिर शाळेने भास्करराव अंबेकर यांच्या मार्गदर्शनात खाजगी व्यवस्थापन प्रकारात जालना तालुक्यातून द्वीत्तीय क्रमांक पटकावला. शाळेच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष भास्करराव अंबेकर यांनी शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. 
यावेळी महिंद्र देशपांडे, माजी सभापती देवनाथ जाधव, हरिहर शिंदे, डॉ.माधव अंबेकर, बाला परदेशी, दीपक रणवरे, नर्सिंगच्या प्राचार्य लियांता निर्मल आदींची यावेळी उपस्थिती होती.
या अभियानात पायाभूत सुविधा, शासन ध्येय धोरण यांची अंमलबजावणी व शैक्षणिक संपादमुख या तीन प्रमुख निकषावर आधारित मूल्यमापन करण्यात आले. शाळेने सर्व निकषांचा पूर्तता करून तालुक्यात द्वीत्तीय क्रमांक पटकावला. 
यावेळी बोलतांना अध्यक्ष भास्करराव अंबेकर म्हणाले की, शाळा जालना तालुक्यातील अनेक गावे व शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करत आहे. यापुढेही शाळेच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न केले जातील व विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सर्व प्रकारच्या भौतिक व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.
शाळेच्या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.राम कदम, सचिव बिजू वाघमारे, कोषाध्यक्ष गणेश तरासे, संचालक नंदकुमार lजाधव, रामचंद्र चौधरी, अश्विन अंबेकर, शोभाताई अंबेकर यांच्यासह आदींनी अभिनंदन केले.
या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गाढवे, प्रेमला पंडित, शिक्षक सूर्यकांत बेले, अशोक माधवले, मोहन भदाडे, शिवहरी मांटे, सुनीता खरात, अमोल पवार, गजानन दळवी, अर्चना भालेराव, शिवराम गिराम, पल्लवी खरात, सुनील जाधव, पुरुषोत्तम चौरे, किर्ती खैरे, अनिता जाधव, अंबादास घायाळ, सीमा इंगळे, अरुणा मांटे, कांचन वाघ, रमेश गाढवे, रामकिसन मोहिते, स्वाती काकडे, उद्धव वाघ, विद्या चौधरी, संदीप वाखारकर, किशोर शेळके, संजय खरात, वसंत गाडेकर, सुमित्रा शर्मा, धनंजय सोनवणे, पूनम मनवर, विशाल वाघ, तुकाराम चव्हाण यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले. शाळेच्या यशाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....