पाटोदा [ माव ] श्री समर्थ माध्यमिक विद्यालयात वीरबाल दिनानिमीत्त निमीत्त चित्रप्रदर्शनी चे आयोजन.
परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
वीरबालक बाबा जोरावारसिंह जी व बाबा फतेहसिंह जी यांच्या संपुर्ण जीवनावर आधारीत रंगीत छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजीत करण्यात आले होते.
सव्वीस डिसेंबर हा दिवस संपुर्ण देशात विरबालदिन म्हणुन साजरा केल्या जातो.
आपृल्या मातृभुमीप्रती - धर्माप्रती प्राणत्याग करनारे कोवळ्या वयातील बालकांचे हे बलिदान चिरकाल प्रेरणा देणारे आहे असे प्रतीपादन केंद्र गट साधन केंद्र समन्वयक कल्याण बागल यांनी केले.
नुकतेच जाहीर झालेल्या मुख्यमंत्री माझि शाळा - सुंदर शाळा या स्पर्धेत परतुर तालुक्यातील संस्था गटातुन श्री समर्थ माध्यमिक विद्यालयास तृतीय पारितोषीक मिळाल्याबद्दल विद्यालयाचे कौतुक व अभिनंदन श्री कल्याण बागल सरांनी केले.
शाळेत सातत्याने विवीध ऊपक्रम व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याबद्दल केंद्र प्रमुख श्री शंकरराव थोटे सरांनी शाळेचे कौतुक केले.
मुख्याध्यापक सुरेश पाटोदकर यांच्या संकल्पनेतुन व संकलनातुन सदरील रंगीत छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजीत करण्यात आले होते.
धनबा सर व विद्यालयाचे सर्व कर्मचारी या वेळी ऊपस्थीत होते.