माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न.

परतूर प्रतीनिधी कैलश चव्हाण
पाटोदा [ मा ] येथील श्री समर्थ माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचे स्नेह मिलन आनंदात संपन्न झाले.
2006-07 या शैक्षणिक वर्षात वर्ग दहावी मधे शिकत असलेले सर्व विद्यार्थी  सलग सतरा वर्षानंतर शाळेत एकत्र आले.
महाराष्ट्र राज्याचे सचिवालय मुंबई , पोलीस , शिक्षक , राजकारण , विवीध व्यवसाय ,  कृषिक्षेत्र अशा विवीध क्षेत्रात अगदी यशस्वी पणे कार्यमग्न होवुन प्रत्येकाने जीवनात यश मिळवले. शाळेत मिळालेले संस्कार व शिस्त यशस्वी होण्यासाठी महत्वाची असते. असे विचार विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. 

माणुस कितीही मोठा झाला तरी जेथे ज्या शाळेत बालपण व्यतीत झालेले असते त्या शाळेला व गुरुजनांना कधीही विसरु शकत नाही.
 बालपणीच्या त्या आठवणीं ती शाळेची ओढ प्रत्येकाच्या मनात कायम असते. बालपणीच्या रम्य आठवणीत सर्वजण रममान झाल्याचे चित्र दिसत होते.

प्रारंभी विद्यादेवी सरस्वती व भारत मातेचे प्रतिमा पुजन करण्यात आले. विद्यालयातील सर्व कार्यरत व सेवानिवृत्त गुरुजनांचा शाल - श्रीफळ -  पुष्पहार व मानाचा फेटा बांधुन सत्कार करुन गुरुजनांचे आशिर्वाद विद्यार्थ्यांनी घेतले. या प्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी विस हजार रुपये किंमतीचे ग्रीन बोर्ड शाळेस सप्रेम भेट दिले.

विद्यालयाच्या वतीने  सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. 
दिवसभर चाललेल्या या स्नेह मेळाव्यासाठी  गावातील प्रतिष्ठीत शिक्षणप्रेमी नागरीक सर्वश्री भाऊसाहेब कादे , बालासाहेब नखाते , सदुभाऊ खवल , लक्ष्मणदादा शिंदे , संभाजी शिंदे , बेंडाले मामा ई . गावकरी ऊपस्थीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री कुंडलीक जाधव यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात