जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान च्या वतीने आदिवासी कनिष्ठ महाविद्यालय पाडळी येथे विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट, शाळेची बॅग व शालेय साहित्य वाटप

परतूर प्रतीनिधी कैलाश चव्हाण
अनु.आदिवासी कनिष्ठ महाविद्यालय पाडळी,तालुका परतुर,जिल्हा जालना येथील 100 विद्यार्थ्यांना 31 डिसेंबर 2024 रोजी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान च्या वतीने ब्लॅंकेट,शाळेची बॅग व शालेय साहित्य वाटप करण्यात आले 
यावेळी प्रमुख उपस्थिती जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संप्रदाय जालना जिल्हा अध्यक्ष नवनाथ पवार , जिल्हा महिला अध्यक्ष सौ वर्षाताई तोटे, जिल्हा कर्नल मधुकर पवार ,जिल्हा लेफ्टनंट कर्नल सुदाम पोटे ,परतुर तालुका अध्यक्ष महादेव काळे , परतुर तालुका महिला अध्यक्ष राहीताई घरडे, जालना तालुका सामाजिक उपक्रम प्रमुख सुनील तोटे सर,परतुर तालुका ब्लड कॅम्प प्रमुख शत्रुघन, प्रदीप गारकर, तसेच भक्त शिष्य शाळेतील सर्व विद्यार्थी शाळेतील सर्व शिक्षक याप्रसंगीउपस्थित होते.
या प्रसंगी मुख्याध्यापक यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या उपक्रमाबद्दल संस्थांनचे आभार मानले.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....