खेळामुळे सांघिक भावना वाढीस लागते एल.के. बिरादार लाबशा विद्यालयात क्रीडा स्पर्धाचे उदघाट्न
परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
परतूर, दि. 17 - खेळामुळे सांघिक भावना वाढीस लागते त्यामुळे विद्यार्थ्यांनी दररोज कुठला ना कुठला खेळ खेळला पाहिजे असे प्रतिपादन लालबहादूर शास्त्री विद्यालयाचे मुख्याध्यापक एल. के. बिरादार यांनी केले. 


येथील शिवाजीनगर भागातील लालबहादूर शास्त्री विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शुक्रवारपासून क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.स्पर्धेचे उदघाट्न मुख्याध्यापक बिरादार यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात उदघाट्क म्हणून ते बोलत होते. पर्यवेक्षक राजकुमार राऊत हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून द्रौपदाबाई आकात इंग्लिश स्कुलच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिलजा मॅडम, त्र्यंबक घुगे, दत्तात्रय आकात, हरिओम कोरके, दिनकर सालगावकर,अरुण वावरे,रामराव पवार,किरण गवई इतरांची उपस्थिती होती.
बिरादार पुढे म्हणाले की, खेळाचे मानवी जीवनात मोठे स्थान आहे. खेळामुळे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते.खेळण्यामुळे शरीर निरोगी तर मन प्रफुल्लित राहते असेही बिरादार म्हणाले. याप्रसंगी राजकुमार राऊत यांनीही आपले विचार व्यक्त केले.
क्रीडा विभागा प्रमुख पंडित निर्वळ, आसाराम धुमाळ. यांनी उपस्थितांचे स्वागत केले.सहशिक्षिका श्रीमती चंदा लड्डा यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यालयात खो-खो, कब्बड्डी या सांघिक स्पर्धासह लांब उडी, उंच उडी, दोरीवरील उड्या, फ्रॉग जंप, सुईदोरा, धावणे, तीन पायाची रेस, स्लो सायकल,संगीत खुर्ची, जिलेबी या व इतर अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.