जालना शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवून बाळासाहेबांना जयंतीनिमित्त अभिवादन !
जालना, (प्रतिनिधी) नरेश अन्ना
दि. 23 हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.
जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्या हस्ते शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून शहरातील गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, वादविवाद स्पर्धा आदींचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर उपजिल्हाप्रमुख बाबुराव पवार, माजी सभापती देवनाथ जाधव, शहर प्रमुख बाला परदेशी, घनश्याम खाकीवाले, दुर्गेश काठोटीवाले, माजी नगरसेवक जे.के. चव्हाण, गंगुताई वानखेडे, विजय पवार, मंजुषा घायाळ यांची उपस्थिती होती.
विविध ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष संघटनेत ८० टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण हा मूलमंत्र घालून दिला. त्याप्रमाणे मुंबईसह राज्यात शिवसेनेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर, रुग्णवाहिका, गोरगरिबांना मदत, कोणतत्याही अडी-अडचणीच्या व संकट समयी शिवसैनिक सर्वात अगोदर धाऊन जातो. त्याच्या गळ्यातील भगवा रुमाल हा शिवसैनिकांची ओळख बनला. राज्यभर पक्षाच्या उभारलेल्या शाखांचे जाळे बाळासाहेबांची कल्पकता होती. या शाखा सामान्य माणसाला मोलाचा आधार वाटायच्या.
दुर्दैवाने आजच्या बदलत्या परिस्थितीत राजकारण सत्ता व गुत्तेदारी भोवती फिरत आहे. शिवसेनाप्रमुखांच्या विचारामुळे सामान्य माणूस आमदार, खासदार, मंत्री होऊ शकला पण पुढे अनेकांनी पक्ष सोडला. परंतु आजही सामान्य माणूस मात्र बाळासाहेबांच्या विचारासोबत ठाम उभा आहे.
त्यामूळे तरुण पिढीने केवळ सत्तेसाठीच नव्हे तर सामाजिक कार्यासाठी तत्पर राहावे व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सोबत काम करावे. असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी केले.
यावेळी दर्शन चौधरी, जीवन खंडागळे, सखावत पठाण, गणेश लाहोटी, अजय रोडे, सावता तिडके, रामेश्वर कूरील यांच्यासह आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती.
हिंदुऱ्हदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त शहरातील मोरांडी मोहल्ला येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन दिनकर चोरमारे यांनी केले व हे रक्तदान यशस्वी करण्यासाठी विनोद भालेकर, भगवान बारवकर, नामदेव तिडके, विलास येवले, महेश भालेकर, अक्षय चोरमारे, अभिषेक जोगदंड, किरण चोरमारे, कैलास भालेकर यांनी परिश्रम घेतले.