शहरात वीवीध ठीकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
जालना प्रतीनीधी नरेश अन्ना
भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त म.गांधी चमन येथील चौकात आयोजित कार्यक्रमात आमदार अर्जुनराव खोतकर व जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी बबलु चौधरी, बाबुराव पवार, पंडितराव भुतेकर, विष्णू पाचफुले, गंगुताई वानखेडे, मंजुषा घायाळ, विजय पवार, अनिल वाघमारे, धरम इंगळे, सदाशिव वाघमारे, बाबासाहेब वानखेडे, दिलीप पाऊलबुद्धे, राजकुमार बुलबुले, दीपक वैद्य, राजेंद्र जाधव, बाबुराव जाधव, जयंत भोसले, दसरथ तोंडुळे आदींची मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शांतिनिकेतन विद्यामंदिर शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
जालना शहरातील शांतिनिकेतन विद्यामंदिर या शाळेत संस्थेचे अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर व बबलू चौधरी यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेपुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली होती.
यावेळी शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.