न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे जिजामाता व स्वामी विवेकानंद यांची साजरी

परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
दि.12  न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे जिजामाता आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती  साजरी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष नारायण दादा सोळंके यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी मुख्याध्यापक साम वर्गीस उपस्थित होते.
याप्रसंगी सहावी ते नववीच्या विद्यार्थिनीं जिजामाता यांची वेशभूषा करुन आल्या होत्या तसेच विद्यार्थी विवेकानंद यांची वेशभुषा करुन आले होते. 
   प्रत्येक हाऊस च्या तीन विद्यार्थ्यानी जिजामाता आणि स्वामी विवेकानंद यांच्या जिवन चरित्रावर आधारित भाषणे केली. प्रशांत वेडेकर, महादेव कदम आणि नम्रता खंदारे यांनी जिजामाता यांच्या जिवन चरित्रावर आधारित भाषणे केली तर संतोष हरकळ, गोविंद पाठक आणि सुरेखा ताजी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जिवन चरित्रावर आधारित भाषणे केली. यावेळी प्रगती वेडेकर यांनी गीत सादर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधिका चव्हाण यांनी केले यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रमोद हिंगमिरे यांनी केले.
  यावेळी शाळेचा सर्व कर्मचारी वर्ग  उपस्थित होता.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लिना साम, पुजा मोरे, मनीषा मोरे, मीना गोरे, प्रियंका बंड, बाळासाहेब बिडवे ईतर सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात