शाळा फक्त कर्मचारी, डॉक्टर, इंजिनियर व अधिकारी नव्हे तर सुसंस्कारित माणूस घडविण्याचे केंद्र झाल्या पाहिजेत -जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर


जालना, प्रतिनिधी नरेश अन्ना (दि.05)
प्रत्येकाच्या जन्मानंतर थोडे कळू लागले की शाळेत घातले जाते. प्रत्येक पालकाची इच्छा असते की, माझ्या पाल्याने शिकून उत्तम गुण घेऊन मोठा अधिकारी, इंजिनिअर, कर्मचारी व्हावे व शाळेतील शिक्षकही तेच उद्दिष्ट ठेवून त्यांना शिकवत असतील तर तसेच विद्यार्थी घडतील. 
 पालक आणि शिक्षकांनी ज्ञानाबरोबरच सुसंस्कारित पिढी घडविण्यासाठी आग्रही राहावे व शाळा म्हणजे केवळ अधिकारी, डॉक्टर, इंजिनिअर, कर्मचारीच नव्हे तर संस्कृत नागरीक घडविण्याचे केंद्र झाल्या पाहिजेत. तरच एक सुसंस्कारित समाज निर्माण होईल. असे शहरातील घायाळ नगर भागातील लोकमान्य प्राथमिक विद्यालयाच्या पाठक मंगल कार्यालय येथे आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर यांनी प्रतिपादन केले.
  यावेळी व्यासपीठावर लोकमान्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शेषराव खरात, छत्रपती संभाजीनगर येथील नितीन खरात, बाबासाहेब डोंगरे, सचिव विजय राजाळे, संचालक गजानन भवर, भाऊराव चव्हाण, संस्थापक अध्यक्ष साहेबराव ढवळे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष त्र्यंबकराव मगर, शालेय समितीचे अध्यक्ष द्वारकानाथ वाघमारे, गणेश वाघमारे, संदीप ढवळे, निरंजन चव्हाण, श्रीमती.पल्लवी जाधव, सामाजिक कार्यकर्ते भीमराव  खरात, समुपदेशक ॲड.जगन्नाथ भुतेकर, श्री.जनार्दन गाडेकर, सौ. कीर्ती चव्हाण, रेणुका गायकवाड, प्रदीप परिहार व मुख्याध्यापक विजय उबरहंडे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना अंबेकर म्हणाले की, आज संपूर्ण मानव जाती पुढे धर्म, जात, भ्रष्टाचार आणि अनीती हे गंभीर विषय निर्माण झाले आहेत. सुसंस्कारित समाजामुळेच या समस्या समूळ नष्ट होतील. आमची संस्कृती खूप दैदीप्यमान आहे ज्यामध्ये अनेक महापुरुषांनी संतांनी चांगल्या समाज निर्मितीचा प्रयत्न केला. परंतु मधल्या काही काळात मनुष्य संपत्ती भोवतीच फिरत असल्यामुळे समाज भ्रष्ट झाला. काही राजकारण्यांनी जाती-धर्मात विष पेरण्याचे काम केले. त्यामुळे आज समाजात अस्वस्थता आहे. खऱ्या अर्थाने देशापुढे जातीयता हाच मोठा प्रश्न आहे. याच्या समूळ उच्चाटनासाठी प्राथमिक शाळेपासूनच मुलांच्या मनावर माणुसकीचे संस्कार घडविणे महत्त्वाचे आहे. असे संस्कार गरिबीचे कार्य लोकमान्य विद्यालयाच्या माध्यमातून होत असल्यामुळे त्यांनी शाळेचे कौतुक केले. 
तर शिक्षक बांधवांनी शाळेतच अभ्यासक्रमाबरोबरच या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे. पालकांनी आपल्या मुलाकडून त्याच्या बौद्धिक कुवतीप्रमाणे अपेक्षा ठेवून राहावे. विनाकारण अपेक्षांचे ओझे त्यांच्यावर लादू नये. असेही यावेळी बोलताना
जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर म्हणाले तर त्यांनी लोकमान्य शिक्षण संस्थेचे सर्व संचालक मंडळ, कर्मचारी व शाळेचे कौतुक केले. 
यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात भाग घेऊन आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करून उपस्थितांचे लक्ष वेधले. 
कार्यक्रमाचे  प्रास्ताविक मुख्याध्यापक विजय उबरहंडे यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शाळा करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती उपस्थितांना दिली. 
महाराष्ट्र वर्कर्स युनियनचे जिल्हा सचिव सुनील मुंढे यांनी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात  शाळेने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकविल्याबद्दल  पालकांच्यावतीने  शाळेचे प्रमुख मुख्याध्यापक विजय उबरहंडे यांचा सत्कार केला.
त्यावेळी बोलतांना अध्यक्ष शेषराव खरात यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलन आवश्यक असल्याचे सांगितले. त्यानंतर बालवाडी ते आठवी पर्यंतच्या 478 विद्यार्थ्यांनी वेगवेगळी समूहनृत्य सादर करून उपस्थित पालकांची मने जिंकली. 
   कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक नारायण भुजंग, विद्यार्थीनी श्रावणी उदावंत, अक्षरा मगर, स्वराली मुळे, ईश्वरी दाभाडे, श्रेया शिंदे, हिंदवी गायके, शिवकन्या खांडेभराड, अक्षरा कणसे, प्रांजल शेजुळ, रिद्धी लग्गड, अंकिता इंगळे यांनी तर आभार शिक्षिका सुमित्रा हजारे यांनी मानले. कार्यक्रमास विदयार्थी, शिक्षक व पालकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात