संपादक ज्ञानेश्वर लंगे यांना मुकनायक पुरस्कार
समाधान खरात (मराठवाडा प्रतिनिधी)
बीड वडवणी येथील प्रसिद्ध साप्ताहिक गदर चे संपादक ज्ञानेश्वर लंगे यांना माजलगाव येथील निर्भीड पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा मुकुनायक पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामुळे गदरचे संपादक ज्ञानेश्वर लंगे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
संपादक ज्ञानेश्वर लंगे यांनी अल्पावधीत गदर साप्तहिकाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना हात घालून आपल्या वर्तमानपत्रात आवाज उठवला. जनतेच्या मनामध्ये गदर साप्ताहिकाने अल्पावधीत नाव कमावल आहे. या साप्ताहिकाच्या कामाची दखल घेऊन माजलगाव येथील निर्भीड पत्रकार संघाने संपादक ज्ञानेश्वर लंगे यांना मुकुनायक पुरस्कार जाहीर केला आहे. पुढील महिन्यात मान्यवरांच्या हस्ते मुकनायक पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे अशी माहिती माजलगाव निर्भीड पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळासाहेब आडागळे, परमेश्वर सोळंके, अमर साळवे, शेख हमीद, राजरत्न डोंगरे, सिद्धेश्वर गायकवाड, संतोष रासवे, विजय कापसे, अनिकेत भिलेगावकर, विजय डावरे, दिगंबर गिरी, ज्येष्ठ पत्रकार प्रदीप कुलकर्णी, मार्गदर्शक प्रचंड सोळंके ,मुंजा गाडेकर, बालासाहेब उफाडे रामभाऊ यादव, रंजीत आडागळे, गणेश तौर, तेजस शिंदे, दत्ता जाधव, यांनी माहिती दिली आहे. हा पुरस्कार संपादक लंगे यांना मिळाल्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनदनाचा वर्षाव होत आहे.