जिल्हा डॉजबॉल संघटनेत परतूर येथील वंडर किड्स इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज च्या विद्यार्थ्याची निवड

परतूर प्रतीनिधी कैलाश चव्हाण
जालना जिल्हा डॉजबॉल संघटनेतर्फे 07/01/2025 रोजी ज्युनिअर, सीनियर मुले मुली संघ निवडण्यासाठी निवड चाचणी आयोजित केली होती त्यात न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज च्या तब्बल बारा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
 या निवड चाचणीतून सोलापूर शहरात 12 व 13 जानेवारी  रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी जालना जिल्हा ग्रामीण मधे हा संघ निवडण्यात आला आहे. 
कॅप्टन विनायक बोरकर, अविराज गोलांडे, रविराज गोलांडे, शिवम ठोंबरे, रवींद्र खरात, विश्वजित बेरगुडे, अनिकेत शेरे, यशवंत लावंगरे, श्रेयश कदम, हनुमान सोळंके, दिपक सोळंके, आर्यन कोल्हे यांची निवड करण्यात आली आहे 
या निवडी बद्दल संस्थेचे अध्यक्ष नारायण दादा सोळंके, कार्याध्यक्ष गणेश सोळंके, मुख्याध्यापक साम वर्गीस 
 प्रा. रमेश शिंदे, विजय चव्हाण, राष्ट्रीय पंच अक्षय ढेंगळे, कुणाल राठोड यांनी अभिनंदन केले आहे व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात