प्रशांत अशोक प्रधान यांना नॅशनल युथ आयकॉन ऑफ द इयर पुरस्कार
परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
प्रशांत अशोक प्रधान यांना नॅशनल युथ आयकॉन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे
नुकताल महाराष्ट्र सदन न्यू दिल्ली येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुरस्कार सोहळा पार पडला त्या सोहळ्यामध्ये श्रीयांश बहुउद्देशीय संस्था व नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी अकॅडमी यांचे संस्थापक व अध्यक्ष प्रशांत अशोक प्रधान यांना त्यांच्या सामाजिक, क्रीडा ,आरोग्य, शैक्षणिक या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल नॅशनल युथ आयकॉन ऑफ द इयरइयर हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
नॅशनल पुरस्कार मिळणे ही गोष्ट माझ्यासाठी अभिमानास्पद व मला प्रेरणा देणारी आहे मी शैक्षणिक क्रिडा, सामाजिक,कला आरोग्य आणि स्किल डेव्हलपमेंट या क्षेत्रामध्ये काम करत असतो पुरस्कारामुळे अजून काम करण्याची प्रेरणा मिळत असते , मी सर्व मान्यवरांचे आभार मानतो धन्यवाद .
प्रशांत अशोक प्रधान (श्रीयांश बहुउद्देशीय संस्था) महाराष्ट्र राज्य