आस लागली संसाराची मनी गं...रानात राबतोय कुणबीनीचा धनी गं...!कवी केशव खटिंग यांच्या काव्यगायनाने रसिक झाले मंत्रमुग्ध ! ll लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या स्नेहसंमेलनाचे थाटात उदघाट्न ll
परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
दि. 22 - येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उदघाट्न सुप्रसिद्ध कवी केशव खटिंग यांच्या हस्ते बुधवारी पार पडले.संस्थेच्या संचालिका श्रीमती वर्षाताई आकात या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या तर प्राचार्य डॉ. भारत खंदारे,मुख्याध्यापक एल. के. बिरादार यांची यावेळी यांची उपस्थिती होती.प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त प्राचार्य डॉ. भगवानराव दिरंगे,प्रा.सखाराम टकले,साहित्यिक छबुराव भांडवलकर,एकनाथ कदम,मुख्याध्यापिका गिरी मॅडम, शिलजा मॅडम, सुरेश बहाड, आर्दड यांची उपस्थिती होती.
कवी खटिंग यांनी यावेळी एकापेक्षा एक सरस कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
झेंडा कोणाचा धरायचा नाही.... आस लागली संसाराची मनी गं... रानात राबतोय कुणबीणीचा धनी गं, लेक इतर कविता सादर त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. सर्व कविताना विद्यार्थ्यानी टाळ्याच्या कडकडाटात प्रचंड प्रतिसाद दिला. आपल्या कवितामधून त्यांनी ग्रामीण जीवन, कष्टकरी जनता, ग्रामीण बोलीभाषा, आजचे आणि पूर्वीचे जीवन यातील फरक आवर्जून सांगितला.
प्रारंभी विद्येची देवता सरस्वती, स्व. बाबासाहेब भाऊंच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
प्राचार्य बिरादार प्रास्ताविक करताना म्हणाले की, आमच्या लालबहादूर शास्त्री विद्यालयाचे स्नेहसंमेलन हे परतूरकरांसाठी आकर्षण असते. आम्ही दरवर्षी नामवंत लेखक, कवी यांना आवर्जून आमंत्रित करतो. कवी, लेखक यांना प्रत्यक्ष पाहण्याचा, ऐकण्याचा योग विद्यार्थ्यांना घडून येतो. या शिवाय विद्यालयात विविध क्रीडास्पर्धा घेतल्या जातात. सांस्कृतिक कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केले जाते. सर्व स्पर्धामध्ये विद्यार्थी आवर्जून भाग घेतात. सर्व स्पर्धामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना निश्चितच वाव मिळतो.
प्राचार्य डॉ.खंदारे यांनी अध्यक्षीय समारोप केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती चंदा लड्डा यांनी तर पर्यवेक्षक राजकुमार राऊत यांनी आभार मानले.
याच कार्यक्रमात शहरातील सर्व पत्रकारांचा पुष्पहार व दैनंदिनी देऊन यथोचित गौरव करण्यात आला. यावेळी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.