Posts

Showing posts from February, 2025

विवेकानंद इंग्लिश स्कूल ,परतूर मध्ये रथसप्तमी निमित्त सूर्यनमस्कार प्रशिक्षण उत्साहात संपन्न!

Image
परतूर प्रतीनिधी कैलाश चव्हाण रथसप्तमीच्या निमित्ताने सूर्यनमस्काराचे महत्त्व अनन्यसाधारण असून, निरोगी आरोग्य व सकारात्मक ऊर्जेसाठी सूर्यनमस्कार महत्त्वाचे मानले जाते. विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य व आनंद वाढावा, या उद्देशाने विवेकानंद शाळेच्या वतीने विशेष सूर्यनमस्कार प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणासाठी योगतज्ञ राधा तांबे व गजानन वायाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी विद्यार्थ्यांनी १२ सूर्यनमस्कारांचे शास्त्रीय पद्धतीने प्रशिक्षण घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनानंतर शाळेचे अध्यक्ष संदीप बाहेकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योग, ध्यान व प्राणायाम महत्त्वाचे आहेत. शाळेत अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन केले जाते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भालचंद्र महाजन सर, विजय धंदाळे सर व शिक्षकवृंदांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सकारात्मक ऊर्जा हा कार्यक्रमाचा मुख्य गाभा ठरला!

परतूरच्या शास्त्री विद्यालयात स्वयंशासन दिन साजरा

परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण     येथील छत्रपती शिवाजीनगर भागातील लालबहादूर शास्त्री विद्यालयात सोमवारी स्वयंशासन दिन (स्कुल डे) उत्साहात साजरा करण्यात आला.   या दिवशी शाळेचे सर्व कामकाज दहावीच्या विद्यार्थ्यांनी हाताळले. रोहित बळीराम राठोड या विद्यार्थ्याने मुख्याध्यापकाची जबाबदारी पार पाडली.    दहावीच्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक,शिक्षक,लिपिक, सेवक या पदाची एक दिवशीय भूमिका पार पाडली.अर्थात शालेय कामकाजाचा अनुभव घेतला.    एकूण पाच तासिका घेण्यात आल्या. त्यानंतर समारोप झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी शिकवत असताना आलेले अनुभव विषद केले.विद्यार्थ्यांना दहावीचे वर्गशिक्षक रामराव पवार, हरिओम कोरके, किरण गवई व बळीराम राठोड यांनी मार्गदर्शन केले.    यावेळी पर्यवेक्षक राजकुमार राऊत यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समृद्धी गाडगे व आदिती कंठाळे यांनी संयुक्तपणे केले.यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.