परतूरच्या शास्त्री विद्यालयात स्वयंशासन दिन साजरा


परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण 
   येथील छत्रपती शिवाजीनगर भागातील लालबहादूर शास्त्री विद्यालयात सोमवारी स्वयंशासन दिन (स्कुल डे) उत्साहात साजरा करण्यात आला.
  या दिवशी शाळेचे सर्व कामकाज दहावीच्या विद्यार्थ्यांनी हाताळले. रोहित बळीराम राठोड या विद्यार्थ्याने मुख्याध्यापकाची जबाबदारी पार पाडली.
   दहावीच्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक,शिक्षक,लिपिक, सेवक या पदाची एक दिवशीय भूमिका पार पाडली.अर्थात शालेय कामकाजाचा अनुभव घेतला.
   एकूण पाच तासिका घेण्यात आल्या. त्यानंतर समारोप झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी शिकवत असताना आलेले अनुभव विषद केले.विद्यार्थ्यांना दहावीचे वर्गशिक्षक रामराव पवार, हरिओम कोरके, किरण गवई व बळीराम राठोड यांनी मार्गदर्शन केले.
   यावेळी पर्यवेक्षक राजकुमार राऊत यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समृद्धी गाडगे व आदिती कंठाळे यांनी संयुक्तपणे केले.यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात