शास्त्री विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप


परतूर -प्रतीनीधी कैलाश चव्हाण
 येथील छत्रपती शिवाजीनगरमधील लालबहादूर शास्त्री विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना गुरुवारी (दि. 6) भावपूर्ण निरोप देण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ शिक्षक हरिओम कोरके हे होते.
    तर प्रमुख पाहुणे म्हणून त्र्यंबक घुगे,रामराव पवार, किरण गवई, पंडितराव निर्वळ,आसाराम धुमाळ,दत्तात्रय आकात,मधुकर वखरे, अरुणकुमार वावरे इतरांची उपस्थिती होती.
     यावेळी समृद्धी गाडगे, आदिती कंठाळे, आरुषी ठोके, पांडुरंग बिल्हारे, वैष्णवी मुजमुले आदी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. तर अरुणकुमार वावरे, मधुकर वखरे, आसाराम धुमाळ यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाजी ढोबळे यांनी केले.
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा धुमाळ, संस्कृती धुमाळ यांनी संयुक्तपणे केले. कार्यक्रमाला विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात