भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन
तळणी प्रतिनिधी रवी पाटील चौयार्शी लाख यौन्नी तून मिळालेला हा नरदेह भंगवत कृपेनेच मिळालेला आहे . हे मानव शरीर एकदाच मिळते हे परत परत मिळणार नाही याचा उपयोग आपण भगवंत भक्ती साठी च केला पाहिजे पाप आणि पुण्याचा संचय सारखे असतील तेव्हाच मनुष्य जन्म मिळतो . . परतू पुण्याचा संचय जर जास्त असेल तर तुम्हाला स्वर्गातील देवत्व प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही . मानव शरीर हे हिर्यापेक्षा अनमोल आहे त्या शरिराला इंतर सुंगधाचे व्यसन लागण्यापेक्षा भगवत भंक्ती चे व व्यसन लावा म्हणजे या नरदेहाचा उपयोग होईल . चार कुपा या मनुष्यावर होत असतात यापैकी भगवत कृपा ही पुण्यवानालाच होत असते . भगवंताच्या भजनाने या नरदेहाचा उद्धार होतो गरज आहे त्याला मनापासून आळवण्याची असे प्रतिपादन प पू चेतन्य बापू याचे कृपा पात्र शिष्य आनंद चैतन्य बापू यांनी तळणी येथून जवळच असलेल्या बेलोरा येथे केले तीन दिवसीय गीतारामायण संत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे . या कलयुगात प्रत्येक मनुष्य दुःखी आहे थोडे थोडे सगळेच दुःखी आहे या संसारात तुम्हाला कोणीच सुखी नजरेला येणार नाही . धनाने सुखी असतील पण शरीर व्याधी...