थोर भक्ती चे लक्षण असे आहे की जी मनुष्याच्या मनावर राज्य करते -साध्वी मुक्ताईनाथ माऊली

तळणी प्रतिनिधी रवी पाटील 
   तळणी येथून जवळच असलेल्या कोकरबां येथे चालू असलेल्या अंखड हरीनाम सप्ताहच्या सहाव्या दिवशीची किर्तन सेवा साध्वी मुक्ताईनाथ माऊली यांची किर्तन सेवा सपञ् झाली जगदगूरु तुकाराम महाराज यांच्या हेचि थोर भक्ती आवडते देवा
सकल्यावी माया संसारची ठेविले अनंते तैसीचे रहावे चिती असो द्यावे समाधान या अभंगावरील भावार्थ विषद केला भक्तानी कुठली भक्ती करावी म्हणजे ती देवाला आवडेल . संतानी केलेली भक्ती पंरपरेनी आलेली आहे . भक्तीचा संवांद खूप सुंदर आहे संतांनी जर आपल्याला भक्तीचे महत्व सांगितले नसं ते तर मनुष्य हा दगडाच्या योग्यतेचा झाला असता .गरगाचार्यांनी भक्ती ची सांगीतलेली व्याख्या नारदाना रुचली नाही नारदानी सांगीतलेली भक्ती की देवाचे राञदिवस नामचितंण करणे आवश्यक आहे आणि जर आपण चिंतन जर विसरलो तर आपण त्या भंगवताच्या नावाने रडणे नारदानी विषंद केलेली भक्ती गोपीकेनी सुद्धा केली म्हणून भगवंताचा सहवास गोपीकेला लाभला तुम्ही आम्ही सुद्धा अशीच भक्ती करा जेणे करून भंगवंत आपल्याजवळच राहीला पाहिजे 

तुकोबारायांना सुद्धा थोर भक्ती या अभगातून विषद केली त्या थोर भक्ती चे लक्षण असे आहे की जी मनुष्याच्या मनावर राज्य करते . आपण केलेल्या भक्ती मधून ज्ञान वैराग्य आपल्याला मिळने गरजेचे आहे संसारा वरील आपली आसक्ती कमी झाली हे जर आपल्याला कळाले तर आपली भक्ती योग्य मार्गाने चालू आहे असे आपण समाजावे . संसाराचा विकल्पच निर्माण होऊ नये म्हणजे सकल्प करायचे कामच राहणार नाही . सकल्प असावा तो भक्तीचा असावा व तो सकल्प पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न जर मनुष्याने केला तर त्याचा आत्मोध्दार झाल्या शिवाय राहणार नाही . यासाठी देवाने आपल्याला जसे ठेवले आहे तसेच राहून त्याला आळवावे . ससारातील माया संपली पाहिजे यासाठी आपल्याला त्याची एकाग्र चित्ताने त्याचे स्मरण करणे गरजेचे आहे 

जीवनामध्ये माणसाने न्यूट्रल असले पाहिजे . आपण पावित्र्य जपून आपली भक्ती करावी . आपल्या संसारात समाधानी राहून त्याची मनोभावे भक्ती केली तर तो भगवंत आपली इच्छा नक्की पूर्ण करेल गरज आहे आपल्या समाधानी राहण्याची हाव आपल्याला धनाची नसली पाहिजे . आपल्याला हाव भगवत भक्तीची परिपूर्ण ओढ असणे गरजेचे आहे . तरच ती भगवत देवाला प्रिय असते . संसारिक मनुष्याकडे भगवत भक्ती साठी वेळ असून सुद्धा तो त्या भगवत भक्ती कडे प्रवृत होत नाही उलट तो धनसंचय करण्यासाठी अधिक वेळ देत आहे धनसंचय हा नाशवत आहे आहे कारण तो धनसंचय भक्ती मार्गाला अडथळा आहे आपल्या प्रारब्धात जेवढे आहे ते मिळणारच आहे ते कोणही हिरावून घेणार नाही . आपल्या सचितात जे आहे ते भगवंतच आपल्याला देतो .आपले प्रेम हे भगवंतावर असले पाहिजे आपले प्रेम धर्मावर असले पाहीजे प्रेम संतावर असले पाहिजे आई वडीलवर आपले प्रेम असणे जास्त गरजेचे आहे

मनुष्याला मिळणारे भौतीक सुख हे क्षणीक आहे त्या संसारिक सुखाच्या मागे धावून उपयोग नाही मृगजाळाचे पाणी पिऊन कोणाचीही थहान भागणार नाही विषयात सुख आहे म्हणजे ते मुर्खता आहे सुख कोठे असेल तर नामस्मरणात भगवत भक्ती आहे ती स्वीकारली तर मनुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही . आपले कर्मच आपले भोग ठरवत असते म्हणून आपले कर्म ठरवून केले पाहिजे चांगले कर्म करणारा मनुष्य म्हणजे साधकच समजावा असे साध्वी महाराजांनी आपल्या निरुपणात या किर्तनासाठी पंचक्रोशीतील हजारो ग्रामस्थाची उपस्थिती होती

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात