प्रा. सिध्दार्थ पानवाले यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल प्रा. सिद्धार्थ रामचंद्र पानवाले यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
भन्ते कश्यप ली यांनी या पुरस्काराची जालना येथे प्रसिध्दीपत्रक आणि निवडीच्या पत्राद्वारे जाहीर केले.
आंबेडकरी चळवळीसाठी आक्रमक वैचारिक भूमिका घेणे प्रसंगी रस्त्यावर येऊन मोर्चे आणि आंदोलन करणे कृतिशील चळवळ करणे यामुळे प्रा. सिद्धार्थ पानवले हे परिचित आहेत.
प्रा. सिद्धार्थ पानवले यांना मिळालेला हा चौथा पुरस्कार आहे.
याअगोदर तेजस फॉउंडेशन नाशिकचा युवा समाजभूषण पुरस्कार,होल्डिंग हँड्स औरंगाबाद चा पुरस्कार, तसेच मुबई येथील सोशल रिसर्च फॉउंडेशन चा सम्राट अशोक राष्ट्रीय धम्म दूत पुरस्कार मिळालेला आहे.
जालना येथे हा पुरस्कार येत्या 30 मार्च रोजी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरीत केला जाणार आहे.
हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्वांकडून अभिनंदन केले जात आहे.