सनी गायकवाड यांना समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे


 परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
  महाराष्ट्र मध्ये फुले शाहू आंबेडकर साठे चळवळीमध्ये काम करणाऱ्या सर्व सामाजिक कार्यकर्ते यांना महाराष्ट्रातील सर्वांचे परिचित भंते कश्यप ली यांच्यावतीने दिनांक 30 मार्च 2025 रोजी वार रविवार या दिवशी पारेगाव तालुका जिल्हा जालना येथे दोन दिवसीय धम्म परिषदेच्या औचित्य साधून त्या रोजी सनी गायकवाड यांना समाजाप्रती प्रामाणिक काम केल्याबद्दल तसेच फुले शाहू आंबेडकर चळवळीत व सन ऑफ आंबेडकर ग्रुप परतुर च्या वतीने विविध गोरगरीब वंचित घोषित घटकातील नागरिकांचे कामे मार्गे लावल्याबद्दल तसेच समाजासाठी अहो रात्र झटकल्याबद्दल त्यांना भंते कश्यप ली यांच्या हस्ते समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे 

 यावेळेस सनी गायकवाड यांना  सांगितले की सर्वात आगोदर आदरणीय भन्ते कश्यप ली यांचे मनापासून आभार मानले,तसेच हा समाजरत्न पुरस्कार घोषित झाल्यानंतर त्यांनी पुढे असे म्हटले मानसन्मान हा विकत घेता येत नसतो समाजाप्रती ग्राउंड लेव्हल ला काम केल्यानंतर नक्कीच असे सन्मान मिळत असतात यापुढेही समाजाप्रती तसेच बाबासाहेबांच्या चळवळीसाठी रात्रंदिवस निस्वार्थी काम करण्याचे बळ मिळालं आहे यापुढेही चळवळीचे काम जोमात करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात