भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन





तळणी प्रतिनिधी रवी पाटील
  चौयार्शी लाख यौन्नी तून मिळालेला हा नरदेह भंगवत कृपेनेच मिळालेला आहे . हे मानव शरीर एकदाच मिळते हे परत परत मिळणार नाही याचा उपयोग आपण भगवंत भक्ती साठी च केला पाहिजे पाप आणि पुण्याचा संचय सारखे असतील तेव्हाच मनुष्य जन्म मिळतो . . परतू पुण्याचा संचय जर जास्त असेल तर तुम्हाला स्वर्गातील देवत्व प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही . मानव शरीर हे हिर्यापेक्षा अनमोल आहे त्या शरिराला इंतर सुंगधाचे व्यसन लागण्यापेक्षा भगवत भंक्ती चे व व्यसन लावा म्हणजे या नरदेहाचा उपयोग होईल . चार कुपा या मनुष्यावर होत असतात यापैकी भगवत कृपा ही पुण्यवानालाच होत असते . भगवंताच्या भजनाने या नरदेहाचा उद्धार होतो गरज आहे त्याला मनापासून आळवण्याची असे प्रतिपादन प पू चेतन्य बापू याचे कृपा पात्र शिष्य आनंद चैतन्य बापू यांनी तळणी येथून जवळच असलेल्या बेलोरा येथे केले तीन दिवसीय गीतारामायण संत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे .

या कलयुगात प्रत्येक मनुष्य दुःखी आहे थोडे थोडे सगळेच दुःखी आहे या संसारात तुम्हाला कोणीच सुखी नजरेला येणार नाही . धनाने सुखी असतील पण शरीर व्याधीने मनुष्य ग्रस्त आहे . सुखी तोच मनुष्य असेल जो भगवताच्या चरणावर व गुरुच्या चरणावर नतमस्तक होईल तो सुखी असेल . मनुष्य सुख कुठून कुठून मिळेल यांच्या वाटा शोधत असतो पण ते त्याला प्राप्त होत नाही ते सुख फक्त संताच्या सहवासात आहे ते सुख गुरुच्या सानिध्यात आहे भगवत भक्ती करत असताना त्याग निष्ठा विश्वास व गुरुबद्दल समर्पण भाव महत्वाचा असतो गरज आहे ती सेवा विश्वासाने करण्याची . संसारतून मनुष्याला सर्वस्व मिळेल हा त्याचा अंधविश्वास आहे . आपल्या संसारावर फक्त परमेश्वराचेच अधिराज्य असले पाहिजे

मनुष्याने समाधानी असने गरजेचे देव त्याला बरोबर देतो आपण संसारातून अपेक्षा केल्या तर त्या प्राप्त होणार नाहीत देव आपल्या ईच्छा आकांक्षा पूर्ण करतो पण आपण ही त्याला मनोभावे पूजले तरच ना आपल्या साधनेत शाश्वत पण असला पाहीज संसारातील प्राप्त करण्याचे सगळे मार्ग जेव्हा बंद होतात तेव्हा एकच मार्ग राहतो तो म्हणजे भगवत भक्तीचा . संसाराची मायेत गुरफटाल तर हा नरदेह भगवत भक्तीच्या कामी कसा येईल ? आपण या संसारात थांबण्यासाठी आलोच नाही . संसार हा माया आहे तो संसार उद्धाराचे साधन होऊ शकत नाही उध्दार व्हावा असे वाटत असेल तर भगवंत भक्ती हा एकमेव पर्याय आहे तो आपण स्वीकार ला पाहिजे या संसारात आपले कोणीच नाही ही भावना असने गरजेच आहे आपली गरज संपली की आपले महत्व संपत असते आपले महत्व शेवटपर्यंत कायम राहण्यासाठी आपल्याला त्या भगवंताला निस्वार्थपणे भजावे लागेल 

मनुष्याला सुखाची अपेक्षा ही जर भगवंताकडून करायची असेल तर आपण ही भगवंताची सेवा करावी असे भगवंताला का वाटू नये .

सपूर्ण भारतच ही संताची भूमी आहे या भूमीचे खूप ऋण आपल्यावर आहे ज्या भारतात या देवभूमीत आपल्याला जन्म मिळाला जेथ प्रत्येकाचे नाते हे प्रेमाचे आहे या ठिकाणी भेद नाही . यावेळी बापूजी नी श्री संत ज्ञानेश्वर यांच्या हरीपाठातील अनेक अंभगवार व संत तुकाराम महाराज यांच्या अंभगावर भाष्य केले 
श्रद्धा निष्ठा आस्था प्रेम भक्ती या मनुष्याच्या जीवनात अग्रस्थानी असने गरजेचे आहे . गरीब आणि श्रीमंत यात भेद नसू नये गरीबी आणि श्रीमंती या प्रारब्धानुसार मिळत असतात त्याच्यात कोणीही भेद करू नये . ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार वेळेनुसार देव त्याला देतोच 
  या तीन दिवसीय गीता रामायण सत्संगाचे आयोजन बेलोरा येथील चैतन्य साधक समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात