संसारीक मनुष्याने परमार्थिक साधनेतील अनुभव समाजाला सांगावाह - हभप प्रमोद महाराज हडप


तळणी प्रतीनीधी रवी पाटील
जगदगुरू तुकाराम महाराज अभंगातून स्वतःच्या स्थितीत वर्णन करतात स्वतःचा अनुभव या ठिकाणी सांगतात *धन्य मी माने ना आपुले संचित राहिले से प्रीत तुझे नामी धन्य झालो आता यासी संदेह नाही न पडो या वाही काळा हाती या* अभंगातून जगद्गुरु तुकोबाराया असे म्हणतात की धन्य मी माणिक ते संचित पुण्याचे देतो कारण तुझ्या नावाच्या ठिकाणी माझी प्रीती म्हणजे आवड आतापर्यंत राहिलेली आहे त्याचं कारण माझं संचित आहे की मी काळाच्या तावडीतून सुटलोय जगद्गुरु लक्षण सांगतात की माझ्या जीवनामध्ये मला संत संगती प्राप्त झाली महाराज संत संगती प्राप्त झाली त्यात काय धन्यता वाटते प्रसंगतीमध्ये 24 ब्रह्म रसाचे पान करायला मिळतं आणि ब्रम्हरसाच पान करून मी सारखा ब्रम्हरस सेवन करतोय पण माझं पोट काही भरतच नाही मग पोट भरेल कसे ब्रम्हरसातून जे सात्वीक भक्तीरसाचा सुंगध दरवळेल ना त्या सुगंधाच्या दरवळणार्या सुंगधाततूनच पोट भरेल सुंगंधा मधील तो सुगंध घेण्याची जी ईच्छा मनुष्य करतो ना तेवढी जरी ईच्छा भगवत भक्ती साठी मनोभावे केली ना तर तो आवाज नक्कीच त्या भगवंता जवळ पोहचल्या शिवाय राहणार नाही . असे प्रतिपादन प्रमोद महाराज हडप यांनी कानडी येथे केले 

      कुठलीही बिल्डिंग बांधत असताना आणि पाया बांधावा लागतो आणि पाया जर पक्का असेल तरच बिल्डिंग जास्त काळ टिकते जर पाया तुम्ही कच्चा बांधला म्हणजे ते घर किती काळ तग धरेल म्हणून तुम्हाला अर्धा जर अभंगाचा समजला नाही तर पुढची बिल्डिंग म्हणजे अभंगाचा विस्तृत चिंतन आपल्याला समजणार नाही .त्याकरता अर्थ कळने फार गरजेचे आहे .तुकोबाराय स्वतःच्या स्थितीचा अनुभवाचे वर्णन करतात पण का हो स्वतःची स्थिती अनुभव समाजाला सांगणं कितपत योग्य आपल्याला आलेला अनुभव समाजाला सांगणं कितपत योग्य आहे त्यातल्या त्यात संसारिकाचा अनुभव सांगत होते संसारातला अनुभव असेल तर सांगणं भूषण नाही पण परमार्थातील अनुभव असेल तर सांगणं भूषणावह असले पाहिजे संसारात बरेच अनुभव येतात आपल्याला पण आपण प्रत्येकाला सांगत बसतो का बरेच लोक प्रश्न करतील महाराज काय सांगता कीर्तनात हे सांगण्यात भूषण आहे का महाराज संसारात आलेला अनुभव लोकांना भूषण नाही संसारातला अनुभव लोकांना सांगणं भूषण नाहीये पण तोच अनुभव जर परमार्थातल असेल तर तो सांगणे गरजेचे आहे .
  
  कीर्तनकारांच्या स्वप्नात देव येत नाही तर ऐकणाऱ्यांचा प्रश्नच नाही की माझ्या स्वप्नामध्ये काशी विश्वेश्वरांना मला दर्शन दिल माझ्या स्वप्नात देवाला इतपर्यंत त्यांनी मला स्वप्नात येऊन सांगितलं काय की जा पैठण क्षेत्रामध्ये दक्षिण काशीमध्ये पैठण क्षेत्रे त्या पैठण क्षेत्रामध्ये नाथ बाबा नावाचे एक संत आहे एकनाथ महाराज नावाचे एक संत त्यांच्या घरी भगवंत 36 वर्ष झालं देव कावडीने पाणी भरून घेतले कारण नाथ महाराजांचा आधिकार मोठा होता भगवंताचे दर्शन कर तुला जर तुझा उद्धार करायचा असेल तर तू पैठणी क्षेत्रांमध्ये जा हा परमार्थात आलेला अनुभव . तो लोकांना अनुभव पण संसारातला अनुभव हा दुःख जमणे असल्यामुळे तो लोकांना सांगणं भूषण नाही असल्यामुळे जगद्गुरु तुकोबाराय हा अभंग आपल्यासाठी प्रतिपादन करतात तो अभंग आपले संचित राहिल म्हणतात की माझी आवड माझी प्रीती तुझ्या नामाच्या ठिकाणी राहिलेली आहे . जगद्गुरु तुकोबारा या ठिकाणी संचितांना धन्यवाद . देतात संचित हे जर वाक्य वरून जात असेल तर प्रत्येक माणसाचं देवाकडेचे खाताय त्याला संचित म्हणतात दिवसा उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जेवढी काय कर्म करतो ती सगळी क्रिया मानकरणांमध्ये येतात शेवटच्या तारखेपर्यंत सोमवारपासून रविवार पर्यंत दिवस उगवल्यापासून झोपेपर्यंत जेवढे काही कळलं तुम्ही करता ती सगळी प्रियमान कर्मामध्ये येतात आणि क्रियमान कर्म हे त्वरित फळ देऊन तुम्हाला शांत करंत जसं तुम्ही पाणी पिल्याचा कर्म केलं तर तुमची तहान लागली तहान भागल्याचा फळ देऊन ते कर्म शांत झालं जर तुम्ही एखाद्याला दारू पिऊन शिव्या दिल्या तर त्यांना तुमच्याकडून म्हणजे शिव्या देण्याचा कर्म कान पटात खाऊन शांत झाले की नाही म्हणजे ते संचित कर्म म्हणजे काय महाराज तर संचित कर्म असेल जे क्रियमाण कर्म देण्याकरता सध्या परिपक्व नाहीये. काही काळ ते आपल्या खात्यामध्ये जमा राहतो फळ न देता त्याला म्हणायचं संचित कर्म संचित या अर्थाचा संचित या शब्दाचा अर्थच खात असाव संचित म्हणजे जे जमा आहे जे क्रियमान कर्म फळ देण्याकरता परिपक्व नाहीये आणि काही काळ जमा राहतात म्हणजे जसं तुम्ही परीक्षा दिली तर निकाल येण्याकरता काही दिवस वाट पाहावी लागते व ते परीक्षा दिल्याचा कर्म निकाल येईपर्यंत तुमच्या खाद्यामध्ये जमा राहतात त्याला संचित कर्म म्हणतात आपल्या खात्यामध्ये अकाउंट मध्ये जमा राहतात त्याला म्हणा संचित कर्म म्हणतात असे महाराजांनी प्रतिपादीत केले 

चौकट 
आपल्या सनातन धर्मावर विविध प्रकारच्या आघातांना सामोरे जावे लागत आहे आपण आपसात न भांडता एकीन राहने गरजेचे आहे आपली संस्कृती ही बंधुत्वाची आहे तीचा आदर करा जाती पातीच्या बंध नात न अडकता आपण सर्व सनातन धर्माचे पाईक आहोत यांची जाणीव सर्वांनी ठेवणे गरजेचे आहे

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात