मनुष्याला चिंतेने ग्रासले आहे त्याला चिंतनाची गरज,तरुणांनी व्यसनापासून दूर राहणे काळाची गरज*,नूतनवर्षाच्या मुहुर्तावर श्री संत सेवालाल महाराज व जगदंबा देवीची मूर्ती प्राणप्रतिष्ठा संपन्न योगानंद बापूची उपस्थीतीत समारोप
तळणी प्रतिनिधी रवी पाटील मनुष्याने स्वःतचे जीवन स्वाभीमानाने जगावे लाचारी ने जीवन जगणे म्हणजे स्वःत चा स्वाभीमान नसने स्वःत च्या कर्तृत्वावर विश्वास नसल्यासारखे आहे . प्रभू चरणी नतमस्तक होऊन स्वाभीमानाने जगेल तोच मनुष्य आयुष्यातील उद्दिष्ट साध्य करू शकतो मनुष्याने सपूर्ण संबलतेने येणार्या संकटांचा सामना करण्यासाठी मनुष्याने चांगल्या रस्त्याची निवड करावी दुष्कर्म पाहुन दुर राहुन चांगले सत्कर्माचे पाईक होणे गरजेचे आहे . संसारातील कर्तव्य या विषयावर बापूनी आज भाष्य केले आनंद चैतन्य बापू नी बेलोरा येथे समारोप प्रसंगी केले मनुष्याला सध्या चिंतेने ग्रासले आहे त्या चितेला पासून त्याला दूर करण्यासाठी त्याला चितंनाची गरज आहे . मानव जन्म हा परत मिळणारा नाही म्हणून आपल्यात भेदभावाची भावना मनात निर्माण होणार नाही असा व्यवहार आपल्या वागण्यात बोलण्यात असणे गरजेचे आहे . आपली संस्कृती ही सनातन हिंदू धर्माची असुन तीला जपा ते आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे धर्मामुळेच आपली ओळख आहे . म्हणून जग सुद्धा आपल्या संस्कृतीचा आदर व स्वीकार करते तीच भावना आपल्या प्रत्येकाची असणे गरजे...