मनुष्याच्या आयुष्यात धर्म महत्वाचा तो जपणे गरजे,श्री गीता रामायण सत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प .पू . आनंद चैतन्य बापू यांचे बेलोरा येथे प्रतिपादन



तळणी प्रतिनिधी रवी पाटील 
  श्रद्धे शिवाय धर्म असू शकत नाही . धर्म हा आमचा प्राण आहे तो प्रत्येकानी जपलाच पाहिजे . धर्मा रक्षिती रक्षीताः धर्माच्या रक्षणाचे कर्तव्य हे प्रत्येकाने केले पाहिजे ते पण श्रद्धा ठेवून . धर्माची उत्पती ही श्रद्धे शिवाय होऊ शकत नाही श्रद्धा ही फक्त आहे म्हणून कसे जमेल आपल्याला तीचे प्राकटय करण विश्वासाने करावेच लागेल म्हणून श्रद्धा ही महत्वाची आहे . संसारिक मनुष्य खूप मेहनत करतो त्या मेहनतीतील थोडी जरी मेहनत आपण श्रद्धेने भगवत भक्ती साठी केली तर त्या भंगवंताची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन बेलोरा येथे चालू असलेल्या श्री गीता रामायण सत्संगाच्या दुसर्या दिवशी प्रतिपादीत केले श्रद्धा वीन धरम नही होई या रामायणातील चौपाई वर निरूपण केले

संसारिक मनुष्याने भगवत भक्ती ही श्रद्धेने केली पाहिजे विश्वासाने केली पाहिजे . जसे की द्रोपदीने विश्वासाने संकटाच्या वेळी भगवंताला शरण जाऊन त्या भगवंताचे स्मरण केले व देव धावून आला . किती श्रद्धा किती विश्वास भगवंता प्रती असला म्हणजे तो आपल्या साठी धावून येईल . त्यासाठी स्वच्छ आणि निस्वार्थ भाव असला म्हणजे तो नक्कीच आपल्या संकट वेळी तो येईलच आपण धर्मासोबतच चालले पाहीजे धर्म आपल्या सोबत येईल शबरी ने आपल्या श्रद्धेवर विश्वास ठेवून भक्ती केली तिने तिचा धर्म जपला म्हणून देव स्वःत तीला भेटायला गेले म्हणून शबरीचा अधिकार सुद्धा मोठा आहे कारण तीची श्रद्धा . जो आपल्या राष्ट्रावर प्रेम करू शकत नाही तो धर्मावर सुद्धा प्रेम करू शकत नाही .

संतांच्या साधनेत सुद्धा त्याची श्रद्धा असते म्हणून तर त्याच्या हाकेवर हजारो लाखो भक्त एकञ येतात कारण त्यांच्या शब्दात असलेले सामर्थ हे त्याच्या साधनेचे फळ असते 
मनुष्याने एकमेकावर प्रेम करणे गरजेचे आहे त्या प्रेमातूनच आपली एकी व्यक्त होत असते परतु मनुष्य आज काल स्वार्थी झाला आहे . एकीच्या बळाने संकटाचे निवारण करण्यासाठी धर्माच्या कामासाठी नक्कीच कामी येईल मनुष्याच्या जीवनात आचरण व संस्कार महत्वाचे आहे आपल्या आई वडिलांना जर आपल्या मुळे खाली पाहावे लागेल तर आपले जीवन काहीच कामाचे नाही . आपल्या जीवनात आई वडीलांचा संघर्ष मोठा आहे यांचे भान तरुणांनी ठेवणे गरजेचे आहे


आज कालचा तरुण व्यसनाला फॅशन समजत आहे खरे तर व्यसनाधीनता ही अनेक पिढ्यांना संपवतेय आपण व्यसनाच्या मस्तीत जर गुरफटलो तर आपण आपल्याला संपवतोय व्यसनामुळे . घराचे वैभव धनसंपती . स्वःतची अब्रू . व सामाजीक प्रतिष्ठा तो गमावून बसतो म्हणून व्यसनापासून दूर राहणे हे गरजेच आहे व्यसनाच्या आधीनते मुळे मनुष्याची आयुष्य मर्यादा सुद्धा कमी झाली आहे यावर आपण सतर्क राहावे असने गरजेचे आहे

मनुष्याच्या आयुष्यातील संगत ही खुप महत्वाची आहे चुकीच्या लोकांसोबत आपली संगत आहे कां हे आपण ओळखले पाहिजे आपल्या संगतीत हे मोठी व चांगली माणसे असली पाहिजे यावरून आपली प्रतीष्ठा वाढेल संगत आपल्या जीवनाचा आधार असते त्यामुळे चुकीच्या व्यक्ती सोबत संगत नको 

 गुडी पाडवा व नुतन वर्षाच्या निमित्य जंगदबा देवी व संत सेवालाल महाराज याच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे . चैतन्य साधक समिती बेलोरा याच्या वतीने श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात