आरक्षण वर्गीकरण आमलबजावनी मोर्चाला मातंग समाजाचा उत्सुर्फ प्रतिसाद .!,अन्याय अत्याचाराच्या विरोधात उपजिल्हाधिकारी यांना मुलींच्या वतीने निवेदन सादर..!

 परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
आज दिनांक ८ एप्रिल रोजी परतूर शहरात सर्वोच्य न्यायालयाच्या निर्देशानुसार अनुसूचित जाती प्रवर्गात आरक्षण वर्गीकरण लागू करणे आणि मातंग समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचारा विरोधात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते.
प्रामुख्याने मोर्च्यात अनुसूचित जाती प्रवर्गात आरक्षण वर्गीकरण झालेच पाहिजे आणि आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे या मागणीच्या पाट्या हातात घेत नागरिकांनी उत्सूर्फपने घोषणा दिल्या.क्रांतीगुरू लहुजी साळवे चौक ते उपजिल्हाधिकारी कार्यालय या मार्गे शिस्तबद्धतेने मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.
दरम्यान उपजिल्हाधिकारी यांना कुमारी माहेश्वरी आव्हाड,अश्विनी हिवाळे,रूपाली हिवाळे,आरती साबळे या मुलींच्या वतीने निवेदन देण्यात आले.
        व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते गणपत भिसे,ॲड.विलास साबळे,ॲड राम चव्हाण,
मारुती वाडेकर,राजू कसबे,संजू गायकवाड,भास्कर नाना शिंदे,शिवाजी भाऊ कांबळे,संतोष तुपसौंदर्य,
रविकांत जगधने,शिवराज जाधव,रंगनाथ गजले, सुरेश साळवे,रवी पाखरे किसन लांडगे,गुलाब साठे,नामदेव साळवे यांची उपस्थिती होती.
  आयोजित मोर्च्यात दिनांक १ ऑगस्ट २०२४ रोजीच्या माननीय सर्वोच्य न्यायालय निर्णयाच्या अनुषंगाने १५ ऑक्टोंबर २०२४ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णया नुसार महाराष्ट्र शासनाने राज्यात तात्काळ आरक्षण वर्गीकरण विधेयक मंजूर करून येत्या जुन महिन्या पासून आरक्षण वर्गीकरणाची आमलबजावणी करून अनुसूचित जातीतील अतीवंचित जातींना संविधानिक समतेचा सामाजिक न्याय मिळवून द्यावा.याबाबतची मागणी
व्यासपीठावरील मान्यवरानी केली.
   दिनांक २३ फेब्रुवारी २०२५ रोजी परभणी येथील अतीवंचित असणाऱ्या मातंग समजातील निष्पाप अल्पवयीन बालीकेवर निराधमानी केलेला अत्याचार प्रकार अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय आहे.याबाबत आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी विशेष चौकशी पथक (SIT) स्थापन करून सदर खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा आणि नराधम आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि या प्रकरणातील अधिकच्या आरोपींवर कायदेशीर कडक कार्यवाही करावी.
आणि महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जातीतील अतीवंचित असणाऱ्या मातंग समाजावर दैंनदिन सातत्याने घडत असलेले अन्याय अत्याचार मालिका ही अत्यंत दुर्दैवी बाब असून याबाबत महाराष्ट्र सरकारने प्रत्येक घटनेतील गुन्ह्यात विशेष चौकशी पथक स्थापन करून दोषी आरोपींवर कायदेशीर कडक शासन करावे आणि मातंग समाजाला तात्काळ न्याय मिळवून द्यावा.
याबाबत मोर्च्यातची मागणी करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अशोक साबळे,इंद्रजीत हिवाळे,ज्ञानेश्वर साळवे,विठ्ठल भारसाकळे,दत्ता हिवाळे,विलास लोखंडे,सुंदर भारसाकळे,पांडुरंग नाटकर,प्रकाश लोंढे,लखन कांबळे,गणेश आव्हाड, यांनी परिश्रम घेतले.

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात