मनुष्याला चिंतेने ग्रासले आहे त्याला चिंतनाची गरज,तरुणांनी व्यसनापासून दूर राहणे काळाची गरज*,नूतनवर्षाच्या मुहुर्तावर श्री संत सेवालाल महाराज व जगदंबा देवीची मूर्ती प्राणप्रतिष्ठा संपन्न योगानंद बापूची उपस्थीतीत समारोप
तळणी प्रतिनिधी रवी पाटील
मनुष्याने स्वःतचे जीवन स्वाभीमानाने जगावे लाचारी ने जीवन जगणे म्हणजे स्वःत चा स्वाभीमान नसने स्वःत च्या कर्तृत्वावर विश्वास नसल्यासारखे आहे . प्रभू चरणी नतमस्तक होऊन स्वाभीमानाने जगेल तोच मनुष्य आयुष्यातील उद्दिष्ट साध्य करू शकतो मनुष्याने सपूर्ण संबलतेने येणार्या संकटांचा सामना करण्यासाठी मनुष्याने चांगल्या रस्त्याची निवड करावी दुष्कर्म पाहुन दुर राहुन चांगले सत्कर्माचे पाईक होणे गरजेचे आहे . संसारातील कर्तव्य या विषयावर बापूनी आज भाष्य केले आनंद चैतन्य बापू नी बेलोरा येथे समारोप प्रसंगी केले
मनुष्याला सध्या चिंतेने ग्रासले आहे त्या चितेला पासून त्याला दूर करण्यासाठी त्याला चितंनाची गरज आहे . मानव जन्म हा परत मिळणारा नाही म्हणून आपल्यात भेदभावाची भावना मनात निर्माण होणार नाही असा व्यवहार आपल्या वागण्यात बोलण्यात असणे गरजेचे आहे .
आपली संस्कृती ही सनातन हिंदू धर्माची असुन तीला जपा ते आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे धर्मामुळेच आपली ओळख आहे . म्हणून जग सुद्धा आपल्या संस्कृतीचा आदर व स्वीकार करते तीच भावना आपल्या प्रत्येकाची असणे गरजेचे आहे
मनुष्याने कोणाचे वाईट चिंतू नाही आपण जर दुसर्याचे वाईट चिंतित असू त्याचे वाईट होणारच नाही . आपण जर दुसर्यासाठी प्रार्थना करु शकतो ना ती प्रार्थना आपल्या साठी पण आहेच ना मग आपण त्या प्रार्थनेचा स्वीकार करणे गरजेचे आहे
आपल्या कर्तव्या पासून मनुष्याने शास्त्राप्रमाणे पालन केलेच पाहिजे
या युगात आईवडीच्या सेवेकडे दुर्लक्ष केले जाते परतु ज्याच्या मुळे आपल्याला जिवन मिळाले आहे त्याचे लाखो उपकार आपल्यावर आहेत मग आपण त्यांना का विसरतो आपणही आई वडीलांच्या कर्तव्यातून जाणार आहोत आईचे स्वरूप हे भगवतांचे आहे तीच गुरु आहे . त्याच्या सेवेतच धर्म आहे
पती पत्नी संसाररूपी रथाचे दोन चाके आहेत . पन्तीचे कर्तव्य आहे की तीन आपल्या पतीचे व परिवाराचा सन्मान करणे तीचा धर्म आहे आज काल परिवारा मध्ये समन्वय राहत नसल्याने कृटुबं उद्धवस्त होत आहे केवळ कर्तव्य न केल्यामुळेच अशा घटना समाजात घडत आहेत . पन्तीने त्याच्या कर्तव्याची जाणीव असणे गरजेच आहे नान्त्यात सरळ सरळ सौदेबाजी होत असल्याने विश्वास राहीला नाही
हुंडा पद्धती मुळे कुंटुब उद्ध्वस्त आहे ज्या ठिकाणी नाते निर्माण क ।रायचे त्या ठिकाणी सोदैबाजी का ? ज्या मुलीला आपण आपल्या घरात घेऊन येता ना ती लक्ष्मीचे स्वरूपच असते हुंडा पद्धत ही पूर्णपणे बंद होणे गरजेचे आहे . व्यवहार होऊन सुद्धा अनेक कृंटुबात विघटन झाले .
गोसेवा करा
आपल्या संस्कृतीत गाईला खुप महत्व आहे तीला सांभाळा आपण गाईला देवाचे स्वरूप मानतो गाईचे प्रेम भगवंताला मिळाले आज तीला आपल्या आधाराची गरज आहे
माता भगिनींना आज स्वातंत्र्य आहे म्हणून स्वंच्छाद राहु नये त्यांनी आपला पेहराव हा आपल्या संस्कृती व सभ्यतेला अनुसरणच असला पाहिजे व्यसन फॅशन व बळी पद्धतीवर यावेळी बापूजी उपस्थीताना मार्गदर्शन केले
हजारो भाविकांच्या उपस्थितीत या सत्संगाचा समारोप झाला तीनही दिवस मोठे अन्नदान केले गेल नववर्षाच्या मुहुर्तावर आज श्री संत सेवालाल महाराज व माता जगंदबा मुर्ती च्या प्राणप्रतिष्ठापना आनंद चैतन्य बापू व प पू योगांनद बापू याच्या हस्ते करण्यात आली