राष्ट्रीय बंजारा परिषद महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष पदी अंजेभाऊ चव्हाण यांची निवड
परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण
जालना-तालुक्यातील पाहेगाव येथील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते अंजेभाऊ चव्हाण यांची राष्ट्रीय बंजारा परिषद महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.ही निवड राष्ट्रीय बंजारा परिषदेचे संस्थापक अध्यक्ष धर्मनेता किसन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय अध्यक्ष विलास राठोड महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष भिकन जाधव,अँड.पंडित राठोड,महाराष्ट्र प्रदेश महासचिव उमेश राठोड ,गोर कलावंत मराठवाडा अध्यक्ष, पंडित महाराज,यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय अध्यक्ष विलास राठोड यांच्या हस्ते नियुक्तीपत्र व शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळीयुवा प्रदेश सचिव श्रीकांत राठोड, युवा मराठवाडा अध्यक्ष राजाराम पवार, युवा कार्याध्यक्ष जालना अजय पवार, मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष संदीप राठोड यावेळी अनेक राज्यातील पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोहरादेवी धर्म पिठ येथे उपस्थित होते.